Special Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार ?
केतकी विरोधात महाराष्ट्रभरात 17 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. मुंबईत गोरेगाव, पवई, भोईवाडा, ठाण्यातील कळव्यात, नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये, कळंबोली, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, अहमदनगर, उस्मानाबादमध्येही केतकीवर गुन्ह्याची नोंद झालीय.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर, आता अभिनेत्री केतकी चितळेची रवानगी ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये झालीय. 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, ठाणे पोलिसांनी केतकीला सत्र न्यायालयात हजर केलं. त्यानंतर केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीमुळं केतकीचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला असला. तर तिच्याविरोधात महाराष्ट्रभरात दाखल गुन्हे पाहता तिला एकापाठोपाठ अटक होऊ शकते. गोरेगाव पोलिसांनी केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे सेंट्रल जेलमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलीय. त्यामुळं केतकी आता गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात जाईल. केतकी विरोधात महाराष्ट्रभरात 17 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. मुंबईत गोरेगाव, पवई, भोईवाडा, ठाण्यातील कळव्यात, नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये, कळंबोली, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, अहमदनगर, उस्मानाबादमध्येही केतकीवर गुन्ह्याची नोंद झालीय.
म्हणजेच 17 ठिकाणी जिथं जिथं गुन्हे दाखल झालेत. तिथले पोलिस केतकीला अटक करु शकतात. याआधी पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण तसंच मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्या प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंमागे अटकसत्र लागलं होतं. 9 एप्रिलला मुंबई पोलिसांनी सदावर्तेंना अटक केली. 13 एप्रिल सदावर्तेंची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झाली. 14 एप्रिलला सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला. साताऱ्यात 4 दिवसांच्या मुक्कामानंतर 18 एप्रिलला साताऱ्याहून पुन्हा मुंबईच्या ऑर्थर रोडमध्ये सदावर्तेंची रवानगी झाली. 20 एप्रिलला सातारा पोलिसांनंतर कोल्हापूरच्या पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला.
केतकीनं शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर, पोलिसांच्या कारवाईचा सपाटा सुरु झालाय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनीही केतकीच्या पोस्टचा निषेध केला. मात्र वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं, असं मतंही पंकजांनी व्यक्त केलंय. तर केतकीवरील कारवाईचं समर्थन शिवसेना करतेय, एक पोस्ट करुन केतकी चितळेंनी कारवाईचं सत्र मागे लावून घेतलंय आणि ठाण्यापासून केतकीची महाराष्ट्रभ्रमंती सुरु झालीय.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू

गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर

तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
