Special Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर !-tv9
. मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करणारे, आता शरद पवारांच्या लेन्सेसमधून पाहतात. अशी टोलेबाजी पंकजांनी धनंजय मुंडेंवर केली. यानंतर धनंजय मुंडे बोलण्यासाठी आले. मात्र त्याआधी बहीण-भावांमधला जिव्हाळा स्टेजवरच दिसला.
निमित्त डॉ. तात्याराव लहानेंच्या मुंबईतल्या रघुनाथ नेत्रालय हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं होतं. पण कार्यक्रमात पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक जुगलबंदीही रंगली आणि दोघा बहीण भावातला प्रेमाचा जिव्हाळा पाहायला मिळाला. कार्यक्रम नेत्रालयाचा असल्यानं पंकजा मुंडेंनीही भाषणाची सुरुवात करतानाच, मंचावर उपस्थित प्रत्येकासाठी ‘लेन्स’चा शब्दप्रयोग करत आपल्या शैलीत कोट्या केल्या. मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करणारे, आता शरद पवारांच्या लेन्सेसमधून पाहतात. अशी टोलेबाजी पंकजांनी धनंजय मुंडेंवर केली. यानंतर धनंजय मुंडे बोलण्यासाठी आले. मात्र त्याआधी बहीण-भावांमधला जिव्हाळा स्टेजवरच दिसला. भाषणासाठी पोडियमकडे येत असतानाच, धनंजय मुंडेंनी पंकजांना मायेनं डोक्यावर हात मारत, टपली दिली.
यानंतर धनंजय मुंडेंनीही आपल्या भाषणातून, पंकजांच्या भाषेत टोला लगावला.. आणि पंकजांताईंनी आता महाविकास आघाडीच्या लेन्समधून पाहिलं तर बरं होईल, असं म्हणत महाविकास आघाडीत येण्याचंच अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. पंकजा मुंडेंनी भाषणाच्या सुरुवातीला धनंजय मुंडेंचं नाव घेताना जशी कोटी केली. तसंच मंचावरील उपस्थित प्रत्येकाबद्दल पंकजा मुंडे बोलल्या. पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये राजकीय वार पलटवार नेहमीच पाहायला मिळतात. मात्र राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी बहीण-भावातला जिव्हाळा कायम आहे, हे पुन्हा एकदा दिसलं.