Special Report | धर्मस्थळांवरून वाद…काशीनंतर आता मथुरा?-TV9
मंदिर-मशिदीचा वाद आता काशी विश्वनाथानंतर मथुरेच्या नगरीपर्यंत आलाय. अयोध्या झांकी है, काशी-मथुरा बाकी है, अश्या घोषणा अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून दिल्या जात होत्या. सध्याचा वर्तमान त्याचं दिशेनं पुढे सरकरतोय.
मंदिर-मशिदीचा वाद आता काशी विश्वनाथानंतर मथुरेच्या नगरीपर्यंत आलाय. अयोध्या झांकी है, काशी-मथुरा बाकी है, अश्या घोषणा अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून दिल्या जात होत्या. सध्याचा वर्तमान त्याचं दिशेनं पुढे सरकरतोय. हे मथुरा नगरीतलं कृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला लागून असलेली ही आहे शाही ईदगाह मशीद. मंदिर आणि मशीद मिळून हा संपूर्ण परिसर १३.३७ एकरावर पसरलाय. या जमिनीचा मालकी हक्क आणि त्या जमिनीवर उभी राहिलेली मशीद या दोन्हींच्याविरोधात कोर्टात वेगवेगळ्या १० याचिका आहेत. हिंदू पक्ष म्हणतो की औरंगजेबाच्या काळात बांधली गेलेली ही ईदगाह मशीदीची जमीन मथुरेचा राजा कंसाची आहे आणि जिथं मशीदीचा मुख्य भाग आहे, त्याच भागात कंसानं उभी केलेली कोठडी होती….ही कोठडी म्हणजे तीच जागा जिथं देवकीला कैदेत ठेवलं होतं, आणि देवकीनं याच कोठडीत कृष्णाला जन्म दिला होता. त्यामुळे मशिदीचा आत सर्व्हे करण्याची याचिका कोर्टानं दाखल झालीय.
मशीद आणि मंदिराचा एकूण परिसर १३.३७ एकराचा आहे… त्यापैकी १०.९ एकरावर सध्याचं मंदिर उभं आहे आणि २.५ एकरावर शाई इदगाह मशीद. मथुरेच्या मंदिराचा इतिहास बघितला तर हे मंदिर आक्रमणकाऱ्यांनी ३ वेळा तोडलं… आणि ४ वेळा नव्यानं बांधलं गेलं. इतिहासकारांच्या मते 1669 मध्ये औरंगजेबाच्या आदेशानं काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं गेलं
आणि 1670 मध्ये मथुरेतलं केशव मंदिर…… पुढे औरंगजेबाच्याच आदेशानं काशी विश्वनाथ मंदिराच्या जागेवर ज्ञानवापी मशीद उभी राहिली, आणि मथुरेत शाई इदगाह मशीद. जाणकारांच्या दाव्यांनुसार इसवी सन 1017-18 मध्ये मोहम्मद गझनवीनं मथुरेतली सर्व मंदिरं तोडली, मात्र त्याचं सैन्य माघारी फिरताच पुन्हा आधीपेक्षा भव्य मंदिरं मथुरेत उभी राहिली….. दरम्यानच्या काळात पुन्हा अनेकदा मंदिरं तोडण्यात आली.
1150 मध्ये महाराजा विजयपाल देव यांच्या शासन काळात पुन्हा मंदिरं बांधण्यात आली. नंतर १६ व्या शतकाच्या सुरुवातीलाच सिंकदर लोदीनं इथली सर्व मंदिर पुन्हा पाडली. यानंतर ओरछाचे राजे राजा वीरसिंह जु देव बुंदेलांनी पाडलेल्या मंदिरांच्या जागेवर पुन्हा मंदिरांचं निर्माण
केलं…हे बांधकाम इतकं भव्य झालं की ते पुन्हा मुघल बादशहा औरंगजेबाच्या डोळ्यात खुपू लागलं…असं म्हणतात की सिंकदर लोदीनं मंदिरं पाडल्यानंतर मथुरेत नव्यानं जी मंदिर उभी राहिली, त्यापैकी एका मंदिराच्या कळसाचा भाग आग्र्याहून दिसायचा…म्हणून १६७० मध्ये औरंगजेबाच्या आदेशानं मथुरेतली मंदिर पुन्हा पाडण्यात आली., आणि पुन्हा मंदिरं इथं उभी राहू नयेत, म्हणून मशीद उभारण्यात आली. जाणकारांच्या दाव्यानुसार आता जी शाही इदगाह मशीद आहे, ती औरंगजेबाच्याच काळात उभी राहिली.
जर सतराव्या शतकात औरंगजेबानं मंदिर पाडून मशीद उभी केली, तर मग आत्ताचं मंदिर कधी उभं राहिलं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. त्यासाठी अठराव्या शतकात काय घडलं, ते पाहावं लागेल.. १८ वं शतक उजाळल्यानंतर जो आत्ताचा जमिनीचा वाद आहे, त्याला तोंड फुटलं.. असं म्हणतात की ही १३ एकर जमीन बनारसचे राजे पटनीमल यांनी खरेदी केली होती. नंतर इंग्रज भारतात आले., त्यांनी या जमिनीचा लिलाव करुन टाकला. आणि तिथूनच जमिनीवरुन हिंदू-मुस्लिमांचा वाद सुरु झाला. मुस्लिमांच्या मते इंग्रजांनी जी जमीन विकली, त्यात काही भाग मशिदीचा सुद्धा आहे. पुढे 1944 मध्ये इंग्रजांकडून उद्योगपती जुगर किशोर बिर्लांनी ही जमीन घेतली. 1951 मध्ये कृष्ण जन्म ट्रस्टची स्थापना झाली… आणि 13.37 एकर जमीन कृष्ण जन्म ट्रस्टला सोपवली गेली.
1953 मध्ये जिथं आधी देवळं होती, तिथं आत्ताच्या मंदिराचं बांधकाम सुरु झालं… 1958 मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण करण्यात आलं. तेव्हाही या परिसराच्या 13 एकरावर मालकी कुणाची, यावर वाद कायम होता. मात्र त्याकाळात श्रीकृष्ण जन्म संस्थान आणि मशीद कमिटीमध्ये एक करार झाला.. या करारानुसार या जागेवर मंदिर आणि मशीद दोघंही राहतील, यावर एकमत झालं… मात्र या कराराला श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टनं कधीच मान्य केलं नाही. श्रीकृष्ण जन्म संस्थान आणि
श्रीकृष्ण जन्म ट्रस्ट या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. आता हिंदू पक्षकार म्हणतायत की ही संपूर्ण जमीनच श्रीकृष्ण मंदिराची आहे… जिथं प्राचीन देवळं पाडून मशीद उभी राहिलीय…..त्यामुळे जर व्हिडीओग्राफी झाली, तर त्यातून काय पुढे येतं, हे पाहणं महत्वाचं आहे.