Special Report | भोंग्यांचा मुद्दा…मंदिरांनाही फटका, भाविक नाराज-TV9
आता भोंग्यांवरुन आरतीचं बंद झाल्यानं, भाविक नाराज झालेत..हाच मुद्दा लक्षात घेऊन, शिर्डीतल्या जामा मशीद ट्रस्टनं पुढाकार घेतला..आम्ही आमची पहाटेची अजान भोंग्यांवरुन बंद करु...पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारती भोंग्यांवरुन वाजवा...आणि त्यासाठी साई मंदिराला परवानगी द्यावी, असं निवेदन शिर्डीतल्या जामा मशीद ट्रस्टनं पोलिसांना दिलंय...
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हाती घेतला आणि त्याचा परिणाम शिर्डीतल्या साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीवर झाला…पहाटे 5 वाजताची काकड आरतीच, भोंग्यांवरुन बंद झाली…काकड आरती ऐकण्यासाठी भाविक मंदिराच्या बाहेरच पहाटे मोठ्या संख्येनं हजर राहायचे…बाहेरच्या LED स्क्रीनवर भाविक साईबाबांचं दर्शन घ्यायचे..आणि स्पीकरवरुन काकड आरती ऐकायचे…मात्र आता भोंग्यांवरुन आरतीचं बंद झाल्यानं, भाविक नाराज झालेत..हाच मुद्दा लक्षात घेऊन, शिर्डीतल्या जामा मशीद ट्रस्टनं पुढाकार घेतला..आम्ही आमची पहाटेची अजान भोंग्यांवरुन बंद करु…पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारती भोंग्यांवरुन वाजवा…आणि त्यासाठी साई मंदिराला परवानगी द्यावी, असं निवेदन शिर्डीतल्या जामा मशीद ट्रस्टनं पोलिसांना दिलंय…साई बाबांच्या काकड आरतीला परंपरा आहे…ही आरती ऐकण्यासाठी महाराष्ट्रच नाही तर देशभरातून भाविक इथं येतात…पण भोंग्यांचा मुद्दा तापला…आणि भोंग्यावरुन वाजणारी साईंची पहाटेची आरती कायद्याच्या कचाट्यात आली…