Special Report | Gopichand Padalkar यांना रोखलं...चौंडीत राजकीय ड्रामा - tv9

Special Report | Gopichand Padalkar यांना रोखलं…चौंडीत राजकीय ड्रामा – tv9

| Updated on: May 31, 2022 | 8:58 PM

अहमदनगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम होता...पण इथंही राजकीय हंगामा झाला. कारण पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांना चौंडीत येण्यापासून 2 तास रोखलं.

अहमदनगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम होता…पण इथंही राजकीय हंगामा झाला. कारण पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांना चौंडीत येण्यापासून 2 तास रोखलं.  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चौंडीत खास कार्यक्रम आयोजित केला…त्या कार्यक्रमाला शरद पवारही आले. त्याचवेळी चौंडीच्या सीमेवरच पडळकर आणि खोतांना पोलिसांनी रोखलं. चौंडीतला राष्ट्रवादीचा कार्यक्रम संपल्यावर पडळकर आणि खोतांना पोलिसांनी पुढं जाऊ दिलं..आणि 2 तास थांबलेला ताफा पुन्हा रवाना झाला. चौंडीत अहिल्यादेवींसमोर नतमस्तक झाल्यानंतर, पुन्हा पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केलाच.  विशेष म्हणजे अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करणं असो..की जयंतीचा कार्यक्रम. पडळकर आणि खोतांनी आधीही पवारांना विरोध केलाय…आत्ताच अहिल्यादेवींची आठवण कशी ? असा सवाल खोतांनीही केलाय. पडळकर असो खोत…या दोन्ही नेत्यांच्या निशाण्यावर पवार कायमच राहिलेत..पण त्याला अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रमही अपवाद राहिला नाही..

Published on: May 31, 2022 08:58 PM