Special Report | वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार?

Special Report | वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार?

| Updated on: Apr 14, 2022 | 11:42 PM

सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. सातारा पोलीस सदावर्ते यांना घेऊन आज साताऱ्यात दाखल झाले. सातारा पोलीस ठाणे आवारात पोहोचल्यानंतर सदावर्ते यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सदावर्ते यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. त्यानंतर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. सातारा पोलीस सदावर्ते यांना घेऊन आज साताऱ्यात दाखल झाले. सातारा पोलीस ठाणे आवारात पोहोचल्यानंतर सदावर्ते यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना उद्या सकाळी 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार आहे.