Special Report | विलीनीकरणावरून गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा सरकारला डिवचलं-TV9

Special Report | विलीनीकरणावरून गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा सरकारला डिवचलं-TV9

| Updated on: May 09, 2022 | 10:08 PM

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी त्यांच्या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. सदावर्ते आता स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह अर्थात एसटी बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभं करणार आहेत.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी
त्यांच्या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. सदावर्ते आता स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह
अर्थात एसटी बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभं करणार आहेत. एसटी कष्टकरी जनसंघ या नव्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची घोषणा करताना सदावर्तेंनी राज्य सरकारला इशाराही दिलाय. एसटी संपामुळे कर्मचाऱ्यांसोबतच एसटी महामंडळाचंही मोठं आर्थिक नुकसान झालंय. संपाचा फटका बसल्यामुळे एसटी बँकेची निवडणूकही लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांच्या एसटी कर्मचारी संघटनांमुळे राजकारणात एसटी बँकेला विशेष
महत्व आहे. सध्या एसटी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं वर्चस्व आहे. एसटी बँकेचे राज्यातभरात तब्बल 90 हजार मतदार, तर 50 शाखा आहेत. अडीच हजारांहून अधिक रुपयांच्या एसटी बँकेत ठेवी आहेत.