Special Report : आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत कधी न्हाणार?
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच कोर्टाचा निकाल यायचा होता म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबला नाही. पुढील काही दिवसात विस्तार निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर येत्या 1 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोर्टाने जैसे थे परिस्थिती सांगितली आहे. त्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही. न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्तार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच कोर्टाचा निकाल यायचा होता म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबला नाही. पुढील काही दिवसात विस्तार निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला.
Published on: Jul 20, 2022 09:57 PM
Latest Videos