Special Report | अपक्ष मतांची जुळवाजुळच नेमकी कशी होणार? -tv9

Special Report | अपक्ष मतांची जुळवाजुळच नेमकी कशी होणार? -tv9

| Updated on: Jun 05, 2022 | 10:37 PM

अपक्षांवर भाजपनं आमिष दाखवण्यास सुरुवात केली असून...त्यांच्यावर ईडी आणि CBIच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. 13 अपक्ष आमदारांपैकी, अधिक आमदार हे शिवसेनेच्या बाजूनं दिसतायत.

अपक्षांवर भाजपनं आमिष दाखवण्यास सुरुवात केली असून…त्यांच्यावर ईडी आणि CBIच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. 13 अपक्ष आमदारांपैकी, अधिक आमदार हे शिवसेनेच्या बाजूनं दिसतायत…पण छोट्या पक्षांचा विचार केला तर तेही 13 आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. त्यांनी भाजप अस्पृश नाही असं म्हटल्यानं भुवया उंचावल्यात. हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांशी संबंधित विवा ग्रुपच्या मागे ईडीही लागलीय. ठाकूरांचे पुतण्याला अटकही झाली. त्यामुळं हितेंद्र ठाकूर काय करतात याकडे नजरा लागल्यात. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे 2 आमदार आहेत. पण बच्चू कडू शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असल्यानं दोन्ही मतं शिवसेनेलाच जाणार, समाजवादी पार्टीचे 2 आमदार आहेत. समाजवादी पार्टीचा महाविकास आघाडी सरकारला पाठींबा आहे. पण वेळेवर काय करणार हे काहीच सांगता येणार नाही.

Published on: Jun 05, 2022 10:37 PM