Special Report | अपक्ष आणि छोटे पक्ष ठरवणार, राज्यसभेत आवाज कुणाचा? कोण जिंकणार? -tv9

Special Report | अपक्ष आणि छोटे पक्ष ठरवणार, राज्यसभेत आवाज कुणाचा? कोण जिंकणार? -tv9

| Updated on: Jun 03, 2022 | 9:03 PM

अखेर राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी, भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे...कारण शिवसेनेच्या संजय पवारांनीही अर्ज मागे घेतला नाही...आणि भाजपच्या धनंजय महाडिकांनीही माघार घेतली नाही. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महाविकास आघाडीनं फडणवीसांना भेटून ऑफर दिली.

अखेर राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी, भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे…कारण शिवसेनेच्या संजय पवारांनीही अर्ज मागे घेतला नाही…आणि भाजपच्या धनंजय महाडिकांनीही माघार घेतली नाही. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महाविकास आघाडीनं फडणवीसांना भेटून ऑफर दिली…आणि भाजपनंही महाविकास आघाडीला ऑफर दिली..मात्र दोघांचीही एकमेकांना ऑफर पटली नाही..त्यामुळं निवडणूक अटळ झाली. उमेदवार अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच चंद्रकांत पाटलांनी, धनंजय महाडिकांच्या विजयाचा दावा केला. राज्यसभेत विजयासाठी एका सदस्याला 42 मतांची गरज आहे. चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानुसार भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून गेल्यावर भाजपकडे 30 मतं राहतात आणि आणखी अपक्षांसह इतरांचे मिळून 12 मतं सांगून, चंद्रकांत दादांनी विजयाची 42 ची मॅजिक फिगर सांगितलीय..

Published on: Jun 03, 2022 09:01 PM