Special Report | तब्बल 20 वर्षानंतर James lane ला कंठ फुटला-tv9

Special Report | तब्बल 20 वर्षानंतर James lane ला कंठ फुटला-tv9

| Updated on: Apr 17, 2022 | 9:14 PM

तब्बल 20 वर्षानंतर जेम्स लेन नावाचं भूत अचानक बोलायला लागलंय. ज्या माणसाच्या विकृत लेखणीमुळे महाराष्ट्राच्या समाजकारणात विष पेरलं गेलं, तो जेम्स लेन 2003 ते 2022 अशी 19 वर्ष मूग गिळून गप्प होता. गेल्या अनेक दिवसांपासून यावरून वाद सुरू होता, आता जेव्हा राज ठाकरेंनी पुन्हा पुरंदरे आणि जेम्स लेनचा मुद्दा बाहेर काढला.

तब्बल 20 वर्षानंतर जेम्स लेन नावाचं भूत अचानक बोलायला लागलंय. ज्या माणसाच्या विकृत लेखणीमुळे महाराष्ट्राच्या समाजकारणात विष पेरलं गेलं, तो जेम्स लेन 2003 ते 2022 अशी 19 वर्ष मूग गिळून गप्प होता. गेल्या अनेक दिवसांपासून यावरून वाद सुरू होता, आता जेव्हा राज ठाकरेंनी पुन्हा पुरंदरे आणि जेम्स लेनचा मुद्दा बाहेर काढला. तेव्हा त्याच्या 5 दिवसातच जेम्स लेननं इंडिया टुडेला मेलद्वारे एक मुलाखत दिली, आणि त्यात अनेक खुलासे केले. जेम्स लेननं ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकातून इतिहासाचं विद्रुपीकरण आणि चिखलपेक केली गेली आणि जेम्ल लेनला या लिखाणासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती पुरवल्याचा आरोप झाला. प्रश्न होता बाबासाहेब पुरंदरेंनी तुम्हाला तुमच्या पुस्तक लिखाणात काही मदत केली का? त्यावर जेम्ल लेननं म्हटलं की, छत्रपती शिवरायांचं पुस्तक लिहिताना पुरंदरेंची मला कोणतीही मदत झाली नाही. मला कुणीही माहिती पुरवली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात मी कोणतेही ऐतिहासिक तथ्य मांडले नाहीत.