Special Report : जयंत पाटील म्हणतात उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील! पाटलांच्या दाव्यामागे नेमकं गणित काय?
राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असं मत जयंत पाटील यांनी मांडलं होतं. मात्र, जयंत पाटील यांच्या या मतामागे काय गणित आहे, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आता 1 ऑगस्टला होणार आहे. तोवर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशावेळी जयंत पाटील यांचा एक दावा पुन्हा चर्चेला आलाय. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाबाबत पाच सदस्यांचे खंडपीठ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात व्हीप झुगारणारे आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असं मत जयंत पाटील यांनी मांडलं होतं. मात्र, जयंत पाटील यांच्या या मतामागे काय गणित आहे, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Published on: Jul 20, 2022 10:16 PM
Latest Videos