Special Report | मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांना अटक होणार ? -tv9
औरंगाबादच्या सभेवरुन अखेर मनसेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झालाच. सरकारला मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम देताना, राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी संपूर्ण भाषणाची तपासणी केली...आणि प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरेंसह आयोजक राजीव जावळीकरांवर गुन्हा दाखल केलाय.
औरंगाबादच्या सभेवरुन अखेर मनसेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झालाच. सरकारला मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम देताना, राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी संपूर्ण भाषणाची तपासणी केली…आणि प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरेंसह आयोजक राजीव जावळीकरांवर गुन्हा दाखल केलाय. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंना प्रमुख आरोपी केलंय. कलम 116, कलम 117, कलम 153 आणि कलम 135 नुसार राज ठाकरेंवर कारवाई करण्यात आलीय. कलम 116 म्हणजे गुन्हा करण्यासाठी मदत करणे
कलम 117 म्हणजे चिथावणीखोर भाषण करणे. कलम 153 दंगे भडकवण्याच्या उद्देशानं चिथावणी देणारं वक्तव्य करणं तर राज ठाकरेंवर कितीही गुन्हे दाखल केले तरी, घाबरणार नाही असं मनसेच्या संदीप देशपांडेंनी म्हटलंय.
सभेला उपस्थित असणाऱ्या या जनसमुदायाला कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल. त्यांच्याकडून शांतता भंग होईल. त्यांच्याकडून सार्वजनिक अशांतता, अपराध घडेल, अगर दंग्यासारखा अपराध घडेल हे माहिती असूनही बेछूट चिथावणीखोर वक्तव्य केली. आणि पोलिसांच्या अटी शर्थींचा भंग केला. त्यामुळं राज ठाकरे संस्थापक अध्यक्ष मनसे, राजीव जावळीकर व इतर संयोजक यांच्याविरुद्ध भादंवी कलम 116, 117, 153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे, औरंगाबाद पोलिसांनी एकूण 16 अटी लावल्या होत्या. त्यापैकी 12 अटीचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं म्हणणंय एकीकडे राज ठाकरेवरच गुन्हा दाखल झाला..तर दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्यात.