Special Report | पंजाबी गायक सिद्धू मुसावालावर 40 गोळ्या झाडल्या, शरिराची चाळण! पंजाबमध्ये गॅंगवॉर सुरु ?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाबमधील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सिद्धू मुसेवाला याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी होती. तर त्याला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची कमी करून ती दोनवर आणली होती.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाबमधील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सिद्धू मुसेवाला याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी होती. तर त्याला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची कमी करून ती दोनवर आणली होती. त्यानंतरच त्याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. ज्यात मारेकऱ्यांनी मुसेवालाच्या शरिराची चाळण केली होती. त्याच्यावर सुमारे दोन डझन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हे आता पोस्टमॉर्टममध्ये समोर येत आहे. या प्रकरणानंतर सिद्धू यांच्या कुटुंबीयांनी तीव्र शोक व्यक्त करत आप सरकारला धारेवर धरले आहे होते. तर यानिमित्तानं पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी या हत्येनंतर पंजाबातील गँगवॉर आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच काय तर पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमधून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही पूर्ण झाले आहे. पाच डॉक्टरांच्या समितीने सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम पूर्ण केले आहे.