Special Report | पोलीस बदली घोटाळा माहितीप्रकरणी Devendra Fadnavis यांना नोटीस -Tv9
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मोठ्य वादात सापडले आहे. कारण फडणवीसांच्या काळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. या प्रकरणा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मोठ्य वादात सापडले आहे. कारण फडणवीसांच्या काळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. या प्रकरणा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनना नोटीस बजावली आहे. फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना बोलावलं होतं. मात्र भाजपने दुसरीकडे आंदोलनची तयारी केली होती. त्यामुळे काय आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणा नवं ट्विट आलं आहे. राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा गाजत आहे.
Published on: Mar 12, 2022 09:37 PM