Special Report | मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई!
Special Report | मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई!
संपूर्ण देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. मात्र, लसीकरणावरुन महाविकास आघाडीत पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाबाबत भाष्य केलं. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीबाबत ट्विट केलं. नंतर त्यांनी ते ट्विट डिलिटही केलं. त्यानंतर काँग्रेसने घोषणा करण्याची घाई करु नये, अशा शब्दात चिमटा काढला. याबाबतचा सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !