Special Report | शरद पवार यांचा इरादा पक्का; स्पष्टच बोलले, नो कॉम्प्रोमाईज!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.“मी कधीच तडजोड करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही,” असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी अजित पवार यांना फटकारलं. त्यामुळे पक्ष एकसंघ राहण्यासाठी आशीर्वाद द्या असं म्हणणाऱ्या अजित पवार गटाला शरद पवार आपलं मानत नाही, असं दिसत आहे.
Published on: Aug 09, 2023 08:43 AM
Latest Videos