Special Report | 50 खोक्यांबाबत सर्वात पहिल्यांदा कोण बोललं होतं?
हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणात अभूतपूर्व चित्र होतं. एखाद्या गावात पिक संरक्षक सोसायटीचं इलेक्शन जिंकल्यानंतरच्या मिरवणुकीत जश्या घोषणा होतात, किंवा गल्लीबोळातल्या क्रिकेट टुर्नामेंट जिंकल्यानंतर जल्लोषासाठी जशी स्पर्धा रंगते, तशीच घोषणांची स्पर्धा सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगली होती. हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.
Published on: Aug 24, 2022 11:23 PM
Latest Videos