Special Report : 2024 च्या निवडणुकीत नेतृत्व एकनाथ शिंदेंच, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

Special Report : 2024 च्या निवडणुकीत नेतृत्व एकनाथ शिंदेंच, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

| Updated on: Jun 30, 2023 | 10:31 AM

2024 च्या विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृ्त्वात लढू, मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाप-शिवसेना युतीचा चेहरा कोण असेल यावर फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही.

मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृ्त्वात लढू, मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शिवाय ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीमुळे गदारोळ झाल्यानंतर “जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केल्याच, एकनाथ शिंदे म्हणाले, असं फडणीवसांनी म्हटलं. तसंच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात.” असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान कल्याण लोकसभेची कोण लढवणार यावरही देवेंद्र फडणवीस म्हणतात…, नेमकं फडणवीस काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 30, 2023 10:31 AM