Special Report | पंकजा मुंडेंचा पत्ता कापतंय कोण? -tv9

Special Report | पंकजा मुंडेंचा पत्ता कापतंय कोण? -tv9

| Updated on: Jun 09, 2022 | 10:07 PM

निवडणुकीच्या शर्यतीतून सलग पाचव्यांदा पंकजा मुंडेंचं नाव मागे पडलं..... आणि त्यांच्या समर्थकांचा संताप पुन्हा एकदा बाहेर आला. कुणी भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढला...कुणी आंदोलन केलं. तर कुणी विषप्राशनानं आत्महत्येचा प्रयत्न केला.

निवडणुकीच्या शर्यतीतून सलग पाचव्यांदा पंकजा मुंडेंचं नाव मागे पडलं….. आणि त्यांच्या समर्थकांचा संताप पुन्हा एकदा बाहेर आला. कुणी भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढला…कुणी आंदोलन केलं. तर कुणी विषप्राशनानं आत्महत्येचा प्रयत्न केला. समर्थकांच्या आरोपांनुसार जर केंद्रात आणि राज्यात गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या गोपीचंद पडळकर, भागवत कराड, उदयनराजे भोसलेंना संधी मिळते. जर गोपीनाथ मुंडेंचे शिष्य असलेल्या राम शिंदे आणि उमा खापरेंना विधानपरिषद मिळते, तर मग गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला का डावललं जातंय? सध्य स्थितीवर पंकजा मुंडें समर्थकांना चंद्रकांत पाटील सबुरीचा सल्ला देतायत. दुसरीकडे भाजपकडून मुंडे-महाजनांचं नाव पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मविआ नेते करतयात. पंकजा मुंडेंचे समर्थक मात्र राज्यसभेप्रमाणे यंदाही आक्रमक आहेत…

Published on: Jun 09, 2022 10:07 PM