Special Report | नवनीत राणांचे फोटो, लीलावतीत राजकीय हंगामा!-TV9
लीलावती हॉस्पिटमधले खासदार नवनीत राणांचे MRI करतानाचे फोटो समोर आले...आणि त्यानंतर, शिवसेनेनं राणांच्या स्पॉन्डिलिसीसच्या आजारावरच सवाल उपस्थित करत, हॉस्पिटल प्रशासनालाच धारेवर धरलं.. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदेंनी लीलावतीच्या हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
लीलावती हॉस्पिटमधले खासदार नवनीत राणांचे MRI करतानाचे फोटो समोर आले…आणि त्यानंतर, शिवसेनेनं राणांच्या स्पॉन्डिलिसीसच्या आजारावरच सवाल उपस्थित करत, हॉस्पिटल प्रशासनालाच धारेवर धरलं.. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदेंनी लीलावतीच्या हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. जेलमधून जामिनावर सुटका झाल्यानंतर, स्पॉन्डिलिसीसच्या त्रासामुळं नवनीत राणा 5 तारखेला हॉस्पिटलमध्ये आल्या…
मात्र उपचारादरम्यानच्या भाजप नेत्यांच्या भेटी असो…की MRI चेकअप, नवनीत राणांचे फोटो व्हायरल झाले. त्यातच भयंकर मानदुखी असतानाही MRI करताना राणा मान उंच कशी करतायत ? असा सवालही शिवसेनेनं केलाय. मनिषा कायंदेंनी, MRI वेळी फोटोत दिसणारा जो कर्मचारी होता, त्यालाही बोलावण्याची मागणी केली. यानंतर तो कर्मचारीही समोर आला. मात्र MRIची प्रक्रिया सुरु असताना, नकळत मागच्या बाजूनं फोटो काढण्यात आल्याचं या कर्मचाऱ्याचं म्हणणंय.