Special Report | मशिदीवरील भोंग्यांवरुन Raj Thackeray पुन्हा आक्रमक -tv9

Special Report | मशिदीवरील भोंग्यांवरुन Raj Thackeray पुन्हा आक्रमक -tv9

| Updated on: Jun 02, 2022 | 11:49 PM

1 मे रोजीच्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी असा इशारा दिला...आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु केलं.. पण हजारो मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस दिली...

१ मे रोजीच्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी असा इशारा दिला…आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु केलं.. पण हजारो मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस दिली…काहींना ताब्यात घेतलं..तर काहींना अटकही झाली…याला एक महिना उलटून गेला…त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनंचं आंदोलन थंडावलं की काय असे प्रश्न विचारले जावू लागले…याला आता राज ठाकरेंनीच पत्रक काढून उत्तर दिलंय..माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनंनं हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे, तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या. आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे. माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही. मशिदींवरच्या भोंग्याविरोधातलं आंदोलन झाल्यानंतर राज ठाकरे अयोध्येला जाणार होते… पण भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला… त्यानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला..आणि राज ठाकरे बॅकफूटवर आल्याची चर्चा सुरु झाली..त्यामुळं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पत्र काढून…मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा संपला नसल्याचं सांगितलंय..आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय..

 

Published on: Jun 02, 2022 11:49 PM