Special Report | बृजभूषणांचं पवार कनेक्शन नेमकं काय आहे?-tv9
आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बृजभूषण सिंहांचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. बृजभूषण सिंहांची भूमिका महाराष्ट्राविरोधी नाही, तर राज ठाकरेंच्या विरोधात आहेत आणि बृजभूषण हे संसदेतही आमचे सहकारी आहेत, असं पवारांनी म्हटलंय.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला, भाजपचेच खासदार बृजभूषण सिंहांचा कडाडून विरोध आहे आणि त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बृजभूषण सिंहांचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. बृजभूषण सिंहांची भूमिका महाराष्ट्राविरोधी नाही, तर राज ठाकरेंच्या विरोधात आहेत आणि बृजभूषण हे संसदेतही आमचे सहकारी आहेत, असं पवारांनी म्हटलंय. शरद पवारांच्या याच वक्तव्यानंतर, ब्रृजभूषण सिंह भलतेच खूष झाले…शरद पवार मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून चूक झाली असती तर 5 वेळा त्यांनी माफी मागितली असती, असं बृजभूषण म्हणतायत. शरद पवारांबरोबरच बृजभूषण यांनी खासदार सुप्रिया सुळेंचंही कौतुक केलंय..राज ठाकरेंवर टीका करत असतानाच, बृजभूषण यांनी सुप्रिया सुळेंचा संसदेतला चने आणि नमकीनचा किस्साही सांगितला.
पवारांनी अशावेळी बृजभूषण यांची बाजू घेतली, जेव्हा राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पवारांवर टीकास्त्र सोडतायत…राज ठाकरेंनी पवारांनी थेट जातीपातीचा आरोप केलेला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांनी राज ठाकरेंना जाहीर सभेतून नास्तीक म्हटलंय…आणि त्यावर पवारांनी प्रत्युत्तरही दिलंय. राज ठाकरे शरद पवारांवर वारंवार शाब्दिक हल्ले करतायत..त्यातच पवारांनी बृजभूषणांच्या सूरात सूर मिसळल्यानं, वादाची नवी ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत.