Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | बृजभूषण यांना आत्ता यूपीचा पुळका कसा आला?-TV9

Special Report | बृजभूषण यांना आत्ता यूपीचा पुळका कसा आला?-TV9

| Updated on: May 10, 2022 | 9:42 PM

राज ठाकरेंना आव्हान देणारा बृजभूषण सिंह हा खासदार गेल्या ३ दिवसात महाराष्ट्रभर माहित झालाय. एकीकडे मनसे आणि भाजपमध्ये जवळीकता आलीय., भाजपचे नेते राज ठाकरेंच्या नव्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत सकारात्मक आहेत.. मात्र मनसेच्या जुन्या मुद्द्यांवरुन बृजभूषण सिंह हट्टाला पेटलेयत.

राज ठाकरेंना आव्हान देणारा बृजभूषण सिंह हा खासदार गेल्या ३ दिवसात महाराष्ट्रभर माहित झालाय. एकीकडे मनसे आणि भाजपमध्ये जवळीकता आलीय., भाजपचे नेते राज ठाकरेंच्या नव्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत सकारात्मक आहेत.. मात्र मनसेच्या जुन्या मुद्द्यांवरुन बृजभूषण सिंह हट्टाला पेटलेयत. यामागे बृजभूषण सिंहांचं राजकारण काय असेल, अप्रत्यक्षपणे विरोधात जाऊन बृजभूषण सिंह योगी सरकारशी पंगा का घेतायत, अशी अनेक प्रश्नं आहेत. काहींच्या मते बृजभूषण भाजपला स्वतःची ताकद आजमावतायत, काहींच्या मते त्यांच्या मतदारसंघावर असलेला त्यांचा होल्ड त्यांना दिल्ली दरबारी दाखवायचाय, तर काहींच्या मते सलग ६ टर्म खासदार राहूनही मंत्री न झालेल्या बृजभूषण सिंहांना आता मंत्रीपदाचे वेध लागलेयत.

यातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, कालपर्यंत राज ठाकरेंना वैयक्तिकरित्या बृजभूषण यांचा विरोध होता. मात्र आज त्यांनी त्यांच्या भूमिकेला हिंदू साधूंशी जोडलंय. ज्यामुळे जर योगी सरकारनं काही कारवाई केलीच, तर त्यानं हिंदू दुखावला जाऊ शकतो, असंही बृजभूषण अप्रत्यक्षपणे सांगतायत. पण मग याआधी बृजभूषण सिंहांनी कधीच राज ठाकरेंना विरोध का केला नाही.,१५ वर्षांनंतर त्यांना राज ठाकरेंच्या जुन्या भूमिका का आठवल्या, यावर मी २००८ पासून राज ठाकरेंशी गाठ पडण्याची वाट पाहत असल्याचा दावा बृजभूषण सिंह करतायत.

बृजभूषण सिंह सलग सहाव्यांदा खासदार आहेत. जेव्हा मोदी लाट नव्हती, तेव्हा सुद्धा हा माणूस लाखांच्या फरकानं जिंकला होता. ज्या जागेवर भाजपकडून वाजपेयींनंतर कुणीच जिंकू शकलं नाही, ती जागा बृजभूषण यांनी जिंकून आणली. तुरुंगात असताना बृजभूषण सिंहांची पत्नी सुद्धा मोठ्या मतांनी लोकसभेवर गेली…. सध्या बृजभूषण खासदार आहेत. आणि त्यांचा मुलगा आमदार….तूर्तास बृजभूषण सिंह विरोधावर ठाम आहेत….मात्र राजकीय महत्वाकांक्षेपुढे अनेक भूमिका बदलतात किंवा त्या मवाळ केल्या जातात…त्यामुळे येत्या दिवसात यूपी सरकार मवाळ होईल की मग बृजभूषण सिंह, हे पाहणं महत्वाचं आहे….

Published on: May 10, 2022 09:42 PM