Special Report | मनसेचं चलो अयोध्या, 5 जूनला Raj Thackeray अयोध्येत-tv9

Special Report | मनसेचं चलो अयोध्या, 5 जूनला Raj Thackeray अयोध्येत-tv9

| Updated on: Apr 17, 2022 | 9:05 PM

जवळपास एक वर्षाहून जास्त काळापासून चर्चेत असलेल्या राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर पक्की झालीय. गेल्या निवडणुकीवेळी सुद्धा अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेना आणि भाजपात चढाओढ रंगली होती. यावेळी ती स्पर्धा शिवसेना आणि मनसेत आहे.

जवळपास एक वर्षाहून जास्त काळापासून चर्चेत असलेल्या राज ठाकरेंच्या अयोध्या
दौऱ्याची तारीख अखेर पक्की झालीय. गेल्या निवडणुकीवेळी सुद्धा अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेना आणि भाजपात चढाओढ रंगली होती. यावेळी ती स्पर्धा शिवसेना आणि मनसेत आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला पोहोचणार आहेत. आणि त्याआधी शिवसेनेचे आदित्य ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला ३ मे च्या डेडलाईनचा इशारा दिलाय. जर 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले नाहीत., तर जसास तसं उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. दरम्यान, मशिदींवरच्या भोंग्याच्या विरोधामुळे मनसेतले काही मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत. मात्र अनेक मुस्लिमानांही मशिदीवरच्या भोंग्याचा त्रास होत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय.