Special Report | Raj Thackeray मुख्यमंत्र्यांच्या ‘मुन्नाभाई’ टीकेला प्रत्युत्तर देणार?-TV9
अयोध्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच, राज ठाकरेंनी अचानक ट्विट करुन दौरा स्थगित केला. त्यामुळं राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर राजकीय वर्तुळालाही लागलीय
मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि आता पुणेही सज्ज झालंय…पुण्यातल्या गणेश कला क्रीडा केंद्रात राज ठाकरेंची सभा होणार आहे. औरंगाबाद प्रमाणेच पुणे पोलिसांनीही अटी आणि शर्थी टाकल्यात. अयोध्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच, राज ठाकरेंनी अचानक ट्विट करुन दौरा स्थगित केला. त्यामुळं राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर राजकीय वर्तुळालाही लागलीय. अर्थात राज ठाकरेंच्या समोर 5 विषय असतील, अयोध्या दौऱ्याला विरोध कडाडून विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीकेसीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मुन्नाभाई म्हटलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर असतील MIMचे अकबरुद्दीन ओवेसी. ओवेसींनी औरंगाबादमधून राज ठाकरेंवर विखारी टीका केली होती. चौथा विषय असेल, औरंगजेबाच्या कबरीचा. ओवेसी कबरीसमोर गेल्यानंतर हा विषय तापला आणि त्यानंतर राज्य सरकारनं कबरीला पोलीस सुरक्षा दिली.
अर्थात पाचवा विषय असेल, मशिदीवरील भोंग्यांचा. राज ठाकरेंचा अल्टिमेटम संपल्यानंतरही मशिदीवरील भोंगे काही उतरले नाहीत. पण सर्वांच्या नजरा तर अयोध्या दौऱ्याकडेच असतील…कारण नवी तारीख राज ठाकरे जाहीर करतात का ?, ते पाहणं महत्वाचं असेल…तर बृजभूषण सिंह माफीच्या मागणीवर ठामच आहेत. बृजभूषण सिंहांबरोबरच उद्धव ठाकरेंची केमिकल लोच्याची टीका आणि अकबरुद्दीन ओवेसीही टार्गेटवर असतील…कारण वार तितकेच तीक्ष्ण झालेत. मनसेच्या भोंग्याच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल तेही राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरेंनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना नुकतंच पत्रही लिहिलंय. याआधी औरंगाबादच्या सभेतूनही राज ठाकरेंनी आरपारचा इशारा दिलाच होता. राज ठाकरेंच्या सभेची तयारी पूर्ण झालीय…स्वत: राज ठाकरेही पुण्यात आलेत..त्यामुळं राज ठाकरेच्या निशाण्यावर कोण हे काही तासांत स्पष्ट होईल.