Special Report | Raj Thackeray यांचा ‘पॉवर’फुल्ल समाचार -tv9
राज ठाकरेंनी ठाण्यातल्या भाषणातून शरद पवारांवरच अधिक निशाणा साधला..आणि त्यानंतर पवारांनी राज ठाकरेंच्या एका एका वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणाऱ्या, बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी सॉफ्ट टार्गेट केलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
राज ठाकरेंनी ठाण्यातल्या भाषणातून शरद पवारांवरच अधिक निशाणा साधला..आणि त्यानंतर पवारांनी राज ठाकरेंच्या एका एका वक्तव्याचा समाचार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणाऱ्या, बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी सॉफ्ट टार्गेट केलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर सडेतोड उत्तर देत पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांचा अभिमान असल्याचं पवार म्हणालेत. शरद पवार भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मुद्दाम टाळतात, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता…त्यावरुनही पवारांनी राज ठाकरेंची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. पवारांनी ज्या अमरावतीच्या भाषणाचा उल्लेख केला. ते राम नवमीचं भाषण आहे. त्यात शिवाजी महाराजांनी कसं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, यावर भाष्य केलं होतं. राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून एक व्हिडीओही व्हायरल होतोय..हा व्हिडीओ आहे स्वत: राज ठाकरेंनी पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचा आहे. ज्यात फुले, शाहू आंबेडकरांचं नाव भाषणात का घेतो हे पवारांनी सांगितलंय..