Special Report | भगवा गमछा दाखवत विरोधकांना संजय राऊतांचा इशारा-tv9
ईडीचे अधिकारी राऊतांना कार्यालयात नेत असताना, राऊतांचं कुटुंब भावूक झालं...राऊतांच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं पाहून शिवसैनिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला..मात्र पोलिसांनी या शिवसैनिकांना तात्काळ ताब्यात घेतलं.
तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. घराबाहेर पडताच राऊतांनी, घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना पाहून हात उंचावले. आणि नंतर गळ्यातील भगवं उपरणं हाती घेत, भगवा झळकावत, विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गाडीच्या दिशेनं नेलं. त्याचवेळी राऊतांनी आपल्याला समोरच्याच गेटनं बाहेर काढण्याची मागणी केली. एकीकडे संतप्त शिवसैनिकांची गर्दी..आणि दुसरीकडे राऊतांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राऊतांच्या विनंतीप्रमाणं ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना समोरच्या गेटनं, बाहेर काढताच, कारचं छत उघडून राऊत उभे राहिले..आणि पुन्हा दोन्ही हात उंचावत आपला इरादा स्पष्ट केला. दुसरीकडे ईडीचे अधिकारी राऊतांना कार्यालयात नेत असताना, राऊतांचं कुटुंब भावूक झालं…राऊतांच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं पाहून शिवसैनिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला..मात्र पोलिसांनी या शिवसैनिकांना तात्काळ ताब्यात घेतलं.