Special Report | संजय राऊत, शिंदे सरकारला बेकायदेशीर का म्हणतायत?-tv9
फडणवीसांनी गणपती बाप्पाची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. बाप्पाची पूजाअर्चा केल्यानंतर सगळ्यांना बाप्पानं सुबुद्धी देवो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
सरकारच बेकायदेशीर आहे आणि शिंदे गटातले 16 आमदारही अपात्र होणार, असं संजय राऊत छातीठोकपणे सांगत आहेत. त्याचं कारण आहे, सुप्रीम कोर्टातील शिवसेनेची याचिका. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार? याचा निर्णय सुप्रीम कोर्टातलं खंडपीठ घेणार आहे. आणि हा निर्णयच शिंदे गटातल्या विरोधात जाईल आणि 16 आमदार जर अपात्र झाले तर शिंदे गटाकडील शिवसेनेच्या 2 तृतियांश आमदारांची संख्या कमी होईल. त्यामुळं सरकार कोसळेल असं राऊतांना वाटतंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवदर्शन सुरु केलंय. आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, मुंबईतल्या सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं. फडणवीसांनी गणपती बाप्पाची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. बाप्पाची पूजाअर्चा केल्यानंतर सगळ्यांना बाप्पानं सुबुद्धी देवो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय.