Special Report | शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, Sanjay Raut यांचा भाजपला इशारा -Tv9

Special Report | शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, Sanjay Raut यांचा भाजपला इशारा -Tv9

| Updated on: Apr 07, 2022 | 9:37 PM

ईडीनं राऊतांवर संपत्ती जप्तीची कारवाई केली, तेव्हा संजय राऊत दिल्लीत होते. आता राऊत मुंबईत आले. पण त्यानिमित्तानं शिवसेनेनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं..शिवसैनिकांनी विमानतळावर संजय राऊतांचं जंगी स्वागत केलं..त्यानंतर राऊतांनी सोमय्यांसह भाजपला इशारा दिलाय. मुंबई विमानतळाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली होती.

ईडीनं राऊतांवर संपत्ती जप्तीची कारवाई केली, तेव्हा संजय राऊत दिल्लीत होते. आता राऊत मुंबईत आले. पण त्यानिमित्तानं शिवसेनेनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं..शिवसैनिकांनी विमानतळावर संजय राऊतांचं जंगी स्वागत केलं..त्यानंतर राऊतांनी सोमय्यांसह भाजपला इशारा दिलाय. मुंबई विमानतळाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली होती.विक्रांत प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून कारवाई होणार, असं राऊत म्हणालेत. भाजपनं स्वत:चीच कबर खोदली असून 25 वर्षे भाजप महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. तर मुंबई विमानतळावर ज्या पद्धतीनं शिवसेनेनं आणि संजय राऊतांनी शक्तिप्रदर्शन केलं. त्यावरुन भाजप नेत्यांनी राऊतांचा जळजळीत शाब्दिक वार केलाय. मुंबई विमानतळावर स्वागत झाल्यानंतर, रॅली काढण्यात आली..विमानतळापासून ते भांडुपपर्यंत राऊतांचा ताफा निघाला. त्याआधी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन राऊतांनी भाजपवर चौफेर टीका केली.