Special Report | मुख्यमंत्रिपदावरुन यापुढेही मविआत स्पर्धा, सुप्रिया सुळेंचा नवस ! -tv9

Special Report | मुख्यमंत्रिपदावरुन यापुढेही मविआत स्पर्धा, सुप्रिया सुळेंचा नवस ! -tv9

| Updated on: May 31, 2022 | 9:15 PM

आई तुळजाभवानीच्याच चरणी, सुप्रिया सुळेंनी पुजाऱ्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी नवस केला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला..तर राष्ट्रवादीचा परिवार दर्शनाला येईल असं गाऱ्हाणं पुजाऱ्यांनी देवीसमोर मांडलं.

आई तुळजाभवानीच्याच चरणी, सुप्रिया सुळेंनी पुजाऱ्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी नवस केला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला..तर राष्ट्रवादीचा परिवार दर्शनाला येईल असं गाऱ्हाणं पुजाऱ्यांनी देवीसमोर मांडलं. पण मुख्यमंत्रिपदावरुन माध्यमांसमोर मात्र सुप्रिया सुळे स्पष्टपणे बोलल्या नाहीत. सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानी देवीसमोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, नवस केला..आणि इकडे संजय राऊतांनी 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असा दावा केला.  राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच मुख्यमंत्रीच होतील, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात असते..मात्र महिला मुख्यमंत्री करायच्याच असतील तर रश्मी ठाकरेच होतील, आणि सुप्रिया सुळेंचा नंबर 25 वर्षांनंतर लागेल, असा टोला शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांनी लगावलाय.  भाजपसोबत मुख्यमंत्रिपदावरुन फिस्कटल्यानं, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यापुढंही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना उद्धव ठाकरेंच्याच दावा करतेय. अर्थात हे सर्व गणित आमदारांच्या संख्येवर अवलंबून असते..आता सुप्रिया सुळेंचा नंबर खरंच लागतो का ?, यासाठी सध्या तरी वाटच पाहावी लागेल.

Published on: May 31, 2022 09:15 PM