Special Report | यापुढं हात तोडून हातात देणार, सुप्रिया सुळे आक्रमक-Tv9
भाजपच्या कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोप महिलेचा आहे. बाल गंधर्व रंगमंदिरातला व्हिडीओ समोर आल्यानंतर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचाही संताप अनावर झाला...यापुढं कोणत्याही पुरुषानं महिलेवर हात उगारल्यास हात तोडून हातात देऊन असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय.
पुण्यातल्या बाल गंधर्व रंगमंदिरात भाजपच्या कार्यकर्त्यानं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीवर हात उगारला. यावरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात येताच महागाईवरुन राष्ट्रवादीनं आधी आंदोलन केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी म्हणजे बालरंधर्व रंगमंदिरात आल्या. मात्र सभागृहात अचानक गोंधळ झाला. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यानं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीवर हात उगारल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं. आपण महागाई संदर्भात स्मृती इराणींना निवेदन देण्यासाठी आल्याचं या राष्ट्रवादीच्या महिलेचं म्हणणंय. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोप महिलेचा आहे. बाल गंधर्व रंगमंदिरातला व्हिडीओ समोर आल्यानंतर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचाही संताप अनावर झाला…यापुढं कोणत्याही पुरुषानं महिलेवर हात उगारल्यास हात तोडून हातात देऊन असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय.
राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपच्या 3 पदाधिकाऱ्यांवर डेक्कन पोलिसात गुन्हे दाखल झालेत. भस्मराज तिकोणे, प्रमोद कोंढरे आणि मयूर गांधींवर गुन्हा दाखल झालाय. या तिघांवर कलम, 354 म्हणजे विनयभंग, कलम 504 म्हणजे चिथावणी देण्याचा प्रयत्न करणे, कलम 506, धमकी देणे, कलम 34 म्हणजे अटक वॉरंट शिवाय पोलीस अटक करु शकतात. पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उलट आरोप केलाय…स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता, पुणे पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी मुळीक यांनी केली. गुन्हा दाखल करुन डेक्कन पोलिसांनी, तपास सुरु केलाय. तर इकडे महिला आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आलीय.
मात्र ज्या पद्धतीनं स्मृती इराणींचा ताफा रोखण्याचा प्रयत्न झाला…त्यांच्या गाडीवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला..तोही एक हल्लाच होता..त्या कार्यकर्त्यांवर कारवाई कधी असा प्रश्न फडणवीसांचा आहे. ज्या महिलेला मारहाण झाली ती महिला म्हणतेय की मी निवेदन देण्यासाठी आली होती. तर भाजपनं इराणींवर हल्ल्याचा डाव होता असा आरोप केला..याचा तपास डेक्कन पोलिस करतेय. पण ज्या पद्धतीनं महिलेवर हात उगारण्यात आला, ते निषेधार्हच आहे.