Special Report | Raj Thackeray यांच्या पहिल्या अटकेची कहाणी-tv9
जवळपास7 वर्षांनंतर राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक युद्द रंगलंय. राज ठाकरेंनी सलग दुसऱ्या सभेत राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीयतेचे आरोप केले., त्यावर अजित पवारांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांवर प्रत्यूत्तर दिलंय. राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवार कधी राज ठाकरेंना लवकर उठण्यावरुन टोमणा मारतायत.
जवळपास7 वर्षांनंतर राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक युद्द रंगलंय. राज ठाकरेंनी सलग दुसऱ्या सभेत राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीयतेचे आरोप केले., त्यावर अजित पवारांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांवर प्रत्यूत्तर दिलंय. राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवार कधी राज ठाकरेंना लवकर उठण्यावरुन टोमणा मारतायत. तर दुसरीकडे अजित पवार राज ठाकरेंच्या हातात असणाऱ्या नॅपकीनवरुन त्यांची नक्कल करतायत. राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या धोरणावर जहरी टीका केलीय. मात्र याआधी राज ठाकरेंच्या निशाण्यावर प्रामुख्यानं अजित पवार असायचे, राष्ट्रवादीवर बोलताना राज ठाकरेंची टीका बहुतांशवेळा अजित पवारांवरच असायची. जसं आत्ता सोमय्या-राऊतांमधल्या शाब्दिक युद्धात पातळी घसरते, तशीच स्थिथी कधी-काळी अजित पवार आणि राज ठाकरेंमधल्या आरोप-प्रत्यारोपावेळी होती.