लसीकरणात नंबर वन असलेल्या महाराष्ट्रात आता लसीकरण पूर्णपणे ठप्प होतं की काय? असं चित्र निर्माण झालंय. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लसीकरण बंद देखील पडलं आहे. कारण राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झालाय. तर 15 एप्रिलपासून केंद्राकडून राज्यांना जो तुटवडा होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त अधिक लसी मिळणार आहेत.