Special Report | अंजनीच्या सुताचा जन्म कुठे? किष्किंधा की अंजनेरी?-TV9

Special Report | अंजनीच्या सुताचा जन्म कुठे? किष्किंधा की अंजनेरी?-TV9

| Updated on: May 28, 2022 | 10:16 PM

नाशिकच्या काही महंतांच्या दाव्यानुसार हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजनेरीलाच झालाय. मात्र कर्नाटकातले गोविंदानंद महाराजांच्या दाव्यानुसार हनुमानाच जन्म कर्नाटकातल्या किष्किंधातलाच आहे. या सगळ्या विषयावर 31 तारखेला नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन केलं गेलंय.

हनुमान चालिसेसाठी मुंबईनंतर आता नागपुरात राणा दाम्पत्यानं आंदोलन केलंय आणि तिकडे नाशिकमध्ये हनुमान नेमकं कुठे जन्मले, यावरुन वाद-प्रतिवाद रंगतोय. नाशिकच्या काही महंतांच्या दाव्यानुसार हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजनेरीलाच झालाय. मात्र कर्नाटकातले गोविंदानंद महाराजांच्या दाव्यानुसार हनुमानाच जन्म कर्नाटकातल्या किष्किंधातलाच आहे. या सगळ्या विषयावर 31 तारखेला नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन केलं गेलंय. राज्यातले अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात हनुमान जन्माबाबतचे पौराणिक पुरावे देणार आहेत. आणि त्यानंतर हनुमानाचं नेमकं जन्मस्थळ कोणतं, याचा फैसला होणार असल्याचा दावा केला जातोय. दोन्ही बाजूंच्या दाव्यानुसार हनुमानाच्या जन्मस्थळावरुन भाविकांची दिशाभूल होतेय…जन्माबाबत अनेक दावे करुन मोठ-मोठ्या देणग्या घेतल्या जातात. मात्र यावरुन एक बैठक होऊन हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कोणतं, याचा निर्णय व्हावा आणि त्याचठिकाणी मोठं मंदिर उभं राहावं, अशी मागणी होतेय.

Published on: May 28, 2022 10:16 PM