Special Report | औरंगाबादमध्ये Raj Thackeray यांच्या निशाण्यावर कोण?-TV9
औरंगाबादमध्ये सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही औरंगाबादला पोहोचण्यासाठी घराबाहेर पडले. शिवतीर्थ निवासस्थानावरुन निघताच, राज ठाकरेंसोबत 30 कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा होता. सर्वातआधी चेंबूरमध्ये राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.
औरंगाबादमध्ये सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही औरंगाबादला पोहोचण्यासाठी घराबाहेर पडले. शिवतीर्थ निवासस्थानावरुन निघताच, राज ठाकरेंसोबत 30 कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा होता. सर्वातआधी चेंबूरमध्ये राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर वाशी टोलनाक्या जवळ गाडी येताच, कार्यकर्ते स्वागतासाठी सज्ज होते. यानंतर राज ठाकरे पुण्यातल्या निवासस्थानी पोहोचले.आता पुण्यातून औरंगाबादला रवाना होण्याआधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी 100 पुरोहित येणार आहेत.सभेपूर्वी मंत्रोच्चारासह राज ठाकरेंना आशिर्वाद दिला जाणार आहे. राज ठाकरेंच्या पुढील वाटचालीसाठी प्रार्थना केली जाणार. इकडे औरंगाबादमध्ये मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. पोलिसांकडूनही 1 मे रोजीच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त असेल. राज ठाकरेंच्या सभेला 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, 5 डीसीपी 7 एसीपी आणि शेकडो पीआय, पीएसआयचा बंदोबस्त असणार, प्रत्यक्ष मैदानावरच 300 पोलिसांचा वेढा असेल.