Special Report | वाद सुरु होताच बीएमसीची नोटीस का धडकते? -tv9

Special Report | वाद सुरु होताच बीएमसीची नोटीस का धडकते? -tv9

| Updated on: May 25, 2022 | 11:33 PM

आमचं घर अनधिकृतच आहे, हे सिद्ध करण्यासाठी राणा दाम्पत्यानं पुन्हा काही अवधी मागून घेतलाय. याआधी आमच्या घरात कोणतंही अनधिकृत काम केलं नसल्याचा दावा राणा दाम्पत्याचा होता. मात्र महापालिकेच्या दाव्यानुसार त्यांच्या घरात १० ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झालंय.

आमचं घर अनधिकृतच आहे, हे सिद्ध करण्यासाठी राणा दाम्पत्यानं पुन्हा काही अवधी मागून घेतलाय. याआधी आमच्या घरात कोणतंही अनधिकृत काम केलं नसल्याचा दावा राणा दाम्पत्याचा होता. मात्र महापालिकेच्या दाव्यानुसार त्यांच्या घरात १० ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झालंय. इतकी वर्ष अनेकांना राणा दाम्पत्याचं मुंबईतही घर आहे, हे सामान्य लोकांना माहित नव्हतं. मात्र राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसेचं आंदोलन सुरु करताच, त्यांच्या घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस गेली. पहिली नोटीस २ मे ला गेली, तेव्हा राणा दाम्पत्य तुरुंगात होतं. नंतर 6 मे ला दुसरी नोटीस गेली, तेव्हा राणा दिल्लील होते. नंतर 9 मे ला अधिकाऱ्यांनी राणांच्या घराची पाहणी केली, त्यात १० ठिकाणी बांधकाम बदलल्याचा दावा केला.

Published on: May 25, 2022 11:33 PM