MSRTC | आता लालपरी होणार चकाचक, एसटी बस अन् स्थानकाच्या स्वच्छतेबाबत ST महामंडळाचा निर्णय काय?

| Updated on: Sep 22, 2023 | 12:56 PM

VIDEO | लालपरी आणि बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती रूपयांचा होणार दंड? राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फ होणार स्वच्छतेची तपासणी

ठाणे, २२ सप्टेंबर २०२३ | एसटी बस आणि एसटी बस स्थानकात स्वच्छता राखली जावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 5 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे, परंतु एसटीच्या अस्वच्छ बसेस रस्त्यावर दिसत आहे. मात्र आता बस किंवा बस स्थानक जर अस्वच्छ असेल तर आगार प्रमुखालाच महागात पडणार आहे. कारण अस्वच्छ बसेस दिसल्यास आगार व्यवस्थापकाला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. असा आदेश आता महामंडळाकडून काढण्यात आला आहेत. राज्यभरात 1 ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे. या अभियानात बसेसच्या स्वच्छतेसाठी शंभर पैकी दहा गुण दिले जाणार आहेत. अभियान सुरू होऊन तब्बल पाच महिने होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने एसटी महामंडळ प्रशासनाकडून, एस टी आगारातील अधिकारी एस टी बस स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहेत.

Published on: Sep 22, 2023 12:53 PM
Sharad Pawar यांच्यासोबत काढलेल्या ‘त्या’ फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल, पवार म्हणाले…
Ganesh Chaturthi 2023 | बाप्पाच्या विसर्जनाला जाताय? जरा जपून! पाण्यात बुडण्याची भिती नाही तर….; BMC चं आवाहन काय?