Anil Parab | एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ घ्यावी, एसटीला मुळ पदावर आणावं : अनिल परब

| Updated on: Nov 24, 2021 | 8:03 PM

गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलंय. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय समिती घेणार असून, शासन निर्णय घेऊ शकत नाही, असंही अनिल परब म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलंय. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय समिती घेणार असून, शासन निर्णय घेऊ शकत नाही, असंही अनिल परब म्हणालेत. अनिल परबांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि आमचं म्हणणं होतं की समितीसमोर विषय आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे संप लांबतच चालला होता. विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती. समितीचा अहवाल यायला उशिर असल्याने काय करायचं याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल, असंही अनिल परब म्हणालेत.

Anil Parab | कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला?, जाणून घ्या
Sadabhau Khot | एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या निर्णय घेणार, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया