अंबादास दानवेंवर टीका करताना सत्तारांची जीभ घसरली, म्हणाले... ज्यांना दोन बायका त्यांना बुटानेच'...

अंबादास दानवेंवर टीका करताना सत्तारांची जीभ घसरली, म्हणाले… ज्यांना दोन बायका त्यांना बुटानेच’…

| Updated on: Jan 06, 2023 | 9:50 PM

सत्तार यांनी अंबादास दानवेंवर टीका करताना, ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे… त्यांना दोन बायका करण्याचा धर्माने अधिकार दिलाय का..? जर अधिकार असेल तर मारू नका .. नसेल तर त्यांना जरूर मारा…

अहमदनगर : शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शाब्दिक चकमकी उडतच आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३६ वा पदवीदान समारंभानंतर देखिल टीका ही झालीच. शिंदे गटाचे नेते, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंवर टीका केली.

सत्तार यांनी अंबादास दानवेंवर टीका करताना, ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे… त्यांना दोन बायका करण्याचा धर्माने अधिकार दिलाय का..? जर अधिकार असेल तर मारू नका .. नसेल तर त्यांना जरूर मारा…

याच्या आधी अंबादास दानवे यांनी आमदार वाणी असते तर गद्दारांना त्यांनी बुटानेच मारलं असतं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी हे विधान केलं.

याचदरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा ते असे आहेत. ते सामान्यांचे आणि लोकप्रिय आहेत, असेही सत्तार म्हणाले.

Published on: Jan 06, 2023 09:26 PM