Rupali Chakankar : कोणी काय परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार, चित्रा वाघ यांना थेट उत्तर

Rupali Chakankar : कोणी काय परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार, चित्रा वाघ यांना थेट उत्तर

| Updated on: Jan 04, 2023 | 7:44 PM

राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

पुणे : उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. तसेच तिच्या विरोधात पोलीस केस ही केली आहे. यानंतर वाघ यांनी महिला आयोग हे कायद्याचं पालन करत नसल्याचे म्हणत रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असल्याचं म्हणत उत्तर दिलं आहे.

त्याचबरोबर चाकणकरव यांनी चित्रा वाघ यांना, कोणीही महिला आयोगाला आव्हान देऊ शकत नाही असेही सुनावलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करताना, तोकड्या कपड्यात सार्वजनिक ठिकाणी फिरणं योग्य नाही, असं म्हटलं होतं. आणि महिला महिला आयोग ही कायद्याचं पालन करत नसल्याची टीका केली होती.

त्यावर राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 04, 2023 07:44 PM