‘मासे खा! ऐश्वर्या राय’च्या डोळ्यावरून बोलणाऱ्या गावित यांना ‘ते’ वक्तव्य भोवले? महिला आयोगाने धाडली नोटीस
भाजप नेते आणि आदिवाशी विकास मंत्री विजयकुमार गावित हे आता त्यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर महिला आयोगाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
पुणे : 22 ऑगस्ट 2023 | भाजप नेते आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आदिवाशी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणीत आता भर पडली आहे. गावित यांनी मासे खा असे वक्तव्य केलं होतं. तर त्यांनी मासे खाल तर तुमचे डोळे हे अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रमाणे होतील. ती मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत असं भर कार्यकर्मात वक्तव्य केलं होतं. त्यांनतर त्यांच्यावर भाजपसह इतर पक्षातील महिला नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. तर त्यानंतर आपल्या या वक्तव्यावरून त्यांनी यु टर्न घेत ऐश्वर्या आपल्या मुली प्रमाणे असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून गावित यांच्या त्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांनी नोटीस पाठवली आहे. तर त्या नोटिसीवर तीन दिवसात खुलासा मागितला आहे. तर खुलासा आल्यानंतर कडक कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गवितांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान होतो. तर लोकप्रतिनिधीना कुठलेही उदाहरण देण्यासाठी महिलांची गरज का भासते? असा सवाल केला आहे. तर महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या लोकप्रतिनिधीवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.