‘राऊताच्या सगळ्या हवेतल्या गप्पा, पुरावे आहेत तर सांगा’; शंभुराज देसाई यांचे थेट राऊत यांना चॅलेंज
त्यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा किस्सा सांगत दावा केला होता. तसेच भाजप आणि एनडीएवर टीका केली होती. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्या टीका केली आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून टीका केली होती. त्यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा किस्सा सांगत दावा केला होता. तसेच भाजप आणि एनडीएवर टीका केली होती. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्या टीका केली आहे. तसेच राऊत यांना खुले चॅलेंज करताना त्यांनी ज्या नेत्याचा दाखला त्यांनी दिला त्याचे नाव सांगा असे म्हटलं आहे. यावेळी राऊत यांच्याबाबत बोलताना शंभुराज देसाई यांनी, राऊत आपल्याला सगळ कळतं असं सांगतात असतात. पण राष्ट्रवादीचा कोण नेता बोलला ते त्यांनी नावासह बोलावं असेही त्यांनी म्हटलं आहे. तर राऊताच्या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. तुमच्याकडे पुरावे आहेत तर सांगा असे देखील शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 24, 2023 09:34 AM
Latest Videos