कोल्हापूर राड्यावर शंभूराज देसाई यांचा सूचक इशारा; म्हणाले, ‘पडद्यामागे जो कोणी’
हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आणि शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलीसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. तर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
मुंबई : कोल्हापूर व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणावरून दोन झाले तापतं आहे. आज याचा उद्रेक झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आणि शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलीसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. तर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. याचमुद्द्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर फोटो पोस्ट करणारे, फोटो डोक्यावर घेऊन नाचवणारे आणि त्यांच्या मागे जे कोणी आहेत त्यांची सायबर सेलमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. तर वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून त्यांची चौकशीची मागणी करू ती करू असेही ते म्हणालेत. गेले 11 महिने महाराष्ट्रात शांततेचं वातावरण आहे, विकासाची कामे सुरू आहेत. त्याला खिळ बसवण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी करतंय का याचा तपास झाला पाहिजे असेही. तर पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.