मविआच्या सभेला भाजपच्या आमदाराचा विरोध, तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील लोकांची काय मागणी?
खेड, मालेगाव, संभाजीनगर आणि आता नागपुरात 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडिची सभा होणार आहे. मात्र याच्याआधी येथे सभेत खोडा पडण्याची शक्यता आहे. येथील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी खेळाच्या मैदानाचा राजकीय सभेसाठी वापर नको म्हणत विरोध केला आहे
नागपूर : राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासह शिंदे गटाचे नामोहरण करण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभर सभा होत आहेत. याच्याआधी खेड, मालेगाव, संभाजीनगर आणि आता नागपुरात 16 एप्रिल रोजी सभा होणार आहे. मात्र याच्याआधी येथे सभेत खोडा पडण्याची शक्यता आहे. येथील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी खेळाच्या मैदानाचा राजकीय सभेसाठी वापर नको म्हणत विरोध केला आहे. तसेच यासाठी त्या भागातील नागरिकांसोबत राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेचे लोकही तयार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर सातशे आठशे लोकांची कॅपॅसिटी असलेल्या या मैदानावर सभा घेण्यावर महाविकास आघाडी का आग्रही आहे असा सवाल उपस्थित केला आहे. जर ही सभा लाखोच्या वर होणार असेल ती इकतं छोटं मैदान कशाला? काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील स्थानिक नेते वरिष्ठांची दिशाभूल करत आहे का? असेही आमदार खोपडे यांनी म्हटलं आहे.