रासप नेते जानकर यांनी दंड थोपाटले; मात्र परभणीत भाजपची वेगळीच खेळी; थेट रासप आमदारालाच…
मात्र युतीत जागा वाटपं किंवा सत्तेत स्थान न मिळाल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, रयत संघटनेचे सदाभाऊ खोत हे नाराज झाले होते. तर रासप नेते महादेव जानकर यांनी मार्ग वेगळा केला आहे. तर आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रासपचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली होती.
परभणी, 30 जुलै, 2023 | सध्या राज्याच्या राजकारणात आणि भाजपच्या युतीत नवे मित्र तयार होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार आणि त्यांचा गट हा भाजप-शिंदे गटाच्या युतीत आला आणि सत्तेत सहभागी झाला. मात्र युतीत जागा वाटपं किंवा सत्तेत स्थान न मिळाल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, रयत संघटनेचे सदाभाऊ खोत हे नाराज झाले होते. तर रासप नेते महादेव जानकर यांनी मार्ग वेगळा केला आहे. तर आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रासपचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली होती. मात्र आता तेच भाजपच्या गळाला लागले की काय अशी चर्चा रंगली आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या गंगाखेड येथून राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे हेच आमचे उमेदवार असतील असं म्हटलं आहे. त्यामुळे गुट्टे हे भाजप कडून लढतील असे तर्क आता लावले जात आहेत.