राजीनाम्यावर पवारांचा काय निर्णय? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
ते त्यांच्या मतापासून अजून बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम अजून तरी दिसत आहे. पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांचा हा निर्णय मान्य नाही.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा त्यांच्या आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगती’ या कार्यक्रमातच केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर ते त्यांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. सभागृहातच त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे तर ते त्यापासून माघार घेत नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी मुंबईत माहिती दिली. यावेळी जयवंत पाटील यांनी, शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. ते त्यांच्या मतापासून अजून बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम अजून तरी दिसत आहे. पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांचा हा निर्णय मान्य नाही. तर त्यांच्या निर्णयावर वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्ष नेते ही फोन करून निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र शरद पवार साहेब त्यांच्या मतावर ठाम दिसत आहेत.