‘राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष’, नाना पटोले यांची प्रदेशाध्य पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

‘राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष’, नाना पटोले यांची प्रदेशाध्य पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

| Updated on: Jun 26, 2023 | 3:58 PM

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्याला या जाबाबदारीतून मुक्त करा म्हणत एक प्रकारे प्रदेशाध्यक्षपदावर हक्क सांगितला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून विविध चर्चांना आणि प्रतिक्रियांना उत आला आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सी खेच होताना दिसत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्याला या जाबाबदारीतून मुक्त करा म्हणत एक प्रकारे प्रदेशाध्यक्षपदावर हक्क सांगितला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून विविध चर्चांना आणि प्रतिक्रियांना उत आला आहे. यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष जर ओबीसी नेता झाला तर उत्तम होईल असं म्हटलं आहे. तर यावेळी आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. तर राष्ट्रवादी हा नेत्यांचा. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष नेत्यांना सल्ला देऊ शकत नाही असा टोला लगावला आहे. तर हा विषय त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय असून त्यावर निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले.

Published on: Jun 26, 2023 03:58 PM