प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; कारवाईच्या सूचना

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; कारवाईच्या सूचना

| Updated on: Feb 09, 2023 | 12:17 PM

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एखाद्या महिला आमदारावर हल्ला केला जात असेल तर ते चूकच आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती नाही. पण लवकरच पोलीस या बाबतची माहिती शोधून काढतील, असं प्रज्ञा सातव म्हणाल्या आहेत. या हल्ल्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. महिला आयोगाने हिंगोली पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. तसंच दामिनी पथक अधिक सक्रीय करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत.

Published on: Feb 09, 2023 12:17 PM