Mohan Bhagwat | हिंदूना काही जिंकायचे नाही, पण हरायचे देखील नाही
हिदूंना कोणाला जिंकायचे नाही, हरवायचे पण नाही. भीती दाखवायची नाही, पण घाबरायचेही नाही. मात्र, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल. विश्वगुरू बनण्याची ताकद भारतात आहे आणि यासाठी संघ प्रयत्न करत आहे, असे भागवत यांनी सांगितले.
नागपूर : ज्ञानव्यापीबाबत दोन्ही समाजाने आपसात निर्णय करावा. मात्र, तसे होत नाही. आम्ही राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालो. पण आता कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. याप्रकरणी न्यायलय जो निर्णय येईल तो पाळावा. मशिदीत शिवलिंग आढळल्यामुळे ते मंदिर आहे, असे वाटते. दोन्ही धर्माची पूजाविधी वेगळी असली तरी आपण वेगळे आहो, असे समजू नये. आपण एकाच देशाचे आहोत, हे लक्षात ठेवावे. दोन्ही समाजाने परस्परांचा सन्मान करावा, असे भागवत म्हणाले. हिंदूंनी खूप सहन केले, देशाचा तुकडासुद्धा गमावला. हिदूंना कोणाला जिंकायचे नाही, हरवायचे पण नाही. भीती दाखवायची नाही, पण घाबरायचेही नाही. मात्र, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल. विश्वगुरू बनण्याची ताकद भारतात आहे आणि यासाठी संघ प्रयत्न करत आहे, असे भागवत यांनी सांगितले.
Published on: Jun 03, 2022 12:06 AM
Latest Videos